E-PaperTop NewsUncategorized

उत्तम बंडू तुपे यांचे साहित्य हे भारतीय समाजाची व संस्कृतीची चिकित्सा करून त्याला नवी वाट दाखवणारे आहे: डॉ.धनंजय भिसे

उत्तम बंडू तुपे यांचे साहित्य हे भारतीय समाजाची व संस्कृतीची चिकित्सा करून त्याला नवी वाट दाखवणारे आहे: डॉ.धनंजय भिसे

PIMPRI CHINCHWAD .1 जानेवारी 2025 , माझा इंडिया न्यूज
“उत्तम बंडू तुपे यांनी निर्माण केलेले साहित्य हे पुन्हा एकदा नीट समजून घेतले पाहिजे. तसेच त्यांच्या साहित्याचा समरसून आस्वाद घेतला पाहिजे. त्यांचे साहित्य हे मूलगामी व सार्वकालिक आहे.ते भारतीय समाजाची व संस्कृतीची चिकित्सा करून त्याला नवी वाट दाखवणारे आहे.”असे गौरवोदगार मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ धनंजय भिसे यांनी ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या मूळा रोड,खडकी, येथील राहत्या निवासस्थानी उदगार काढले. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून डॉ. धनंजय भिसे संपादित ” उत्तम बंडू तुपे यांचे साहित्य: एक परिशीलन” या ग्रंथाच्या मुखपृष्ठाचे अनावरण उत्तम बंडू तुपे यांचे चिरंजीव मिलिंद तुपे व प्रतिमा पब्लिकेशनचे प्रमुख दीपक चांदणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर ग्रंथांमध्ये महाराष्ट्रातील अभ्यासक समीक्षक विचारवंतांनी यामध्ये आपले लेख लिहिले आहेत लवकरच उत्तम बंडू तुपे यांच्या साहित्यावर एक राज्यव्यापी चर्चासत्र पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने संपादित केलेल्या ग्रंथाचे मुखपृष्ठाचे अनावरण जयंतीच्या औचित्य साधून करण्यात आले .यावेळी मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, उत्तम बंडू तुपे यांचे नातू अंकित इ. उपस्थित होते. उत्तम बंडू तुपे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुखपृष्ठ अनावरणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button