
सकल मातंग समाजाच्या वतीने 76वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.:- गणेश कलवले
पिंपरी :- 26/01/25 , प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) , ७६वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आद्य आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बहुजन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरहरे काका यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून खाऊवाटप करण्यात आला.
दरम्यान ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या संविधान ला अभाधित ठेवण्याचा संकल्प केला. जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे यांनी काढलेल्या संविधान यात्रेत सहभागी होऊन सुरुवात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारक सह भक्ति शक्ती समुह शिल्प,बसवेश्वर महाराज तसेच क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे,वासुदेव बळवंत फडके व महाराणा प्रताप यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण सुरुवात करण्यात आली. तसेच संविधान रॅलीचा शेवट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पूर्णकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून वीर अमर जवानांना लोकसेवक युवराज दाखले यांनी श्रद्धांजली अर्पित केली.
यावेळी ज्येष्ठ बहुजन समाजाचे मार्गदर्शक हरहरे काका ,ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले ,प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले ,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, महासचिव सुरज आण्णा कांबळे, क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश शिंदे, राजू आवळे, आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष बाबू पाटोळे, शिवशाही व्यापारी संघ निगडी विभाग अध्यक्ष बापू डांबरे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष डी पी खंडाळे ,रामदास कांबळे ,अण्णासाहेब कसबे , राजु चव्हाण,माथाडी कामगार नेते आबासाहेब मांढरे,आर पी आय मातंग आघाडी शहराध्यक्ष धीरज सकट, शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, उपाध्यक्ष विक्रम गायकवाड ,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते