E-PaperTop NewsUncategorized
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या शिरूर लोकसभा अध्यक्षपदी खान अरशद असलम यांची नियुक्ती जाहीर.

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या शिरूर लोकसभा अध्यक्षपदी खान अरशद असलम यांची नियुक्ती जाहीर
मुंबई :- 31/01/25 प्रतिनीधी,(माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले यांच्या सुचनेने व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या अनुमोदनाने शिरूर लोकसभा अध्यक्षपदी खान अरशद असलम यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातुन जाहीर केली.
नवनयुक्त शिरूर लोकसभा मतदार संघ अध्यक्ष- खान अरशद यांनी सर्वसामान्य जनता ,मुस्लिम व्यापारी व इतर वर्ग, सर्वसामान्य नागरिक माता भगिनी यांचे शासन दरबारी प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सुचना व विनंती दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.