
संविधान सन्मान दौड २०२५ चे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे
पुणे: महाराष्ट्र: 11/01/25 , प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज )
संविधान सन्मान दौड 2025 आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
येत्या २५ जानेवारी २०२५ रोजी ही स्पर्धा होणार असून स्पर्धकांची नावनोंदणी सुरू झाल्याची माहिती ‘संविधान सन्मान दौड’
मुख्य आयोजक :-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे,अध्यक्ष परशुराम वाडेकर आणि डॉ.विजय खरे ( विभाग प्रमुख : संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
‘संविधान सन्मान दौड २०२५’ ची माहिती देताना
मुख्य आयोजक :-
परशुराम वाडेकर म्हणाले, या स्पर्धेचे यंदा हे तिसरे वर्षे आहे,मागील वर्षी या स्पर्धेत तब्बल ५० देशांचे ५ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते,
यावर्षी ६ ते ७ हजार स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज आहे,
त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. यंदाची स्पर्धा
दिनांक २५ जानेवारी रोजी पहाटे ५.०० वाजता खाशाबा जाधव क्रीडा संकुल,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सुरू होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी बंधनकारक आहे.
२१ जानेवारी २०२५ ही नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास टी-शर्ट, सर्टिफिकेट,मेडल, संविधानाची प्रत देण्यात येणार आहेत,तसेच विविध वयोगटातील पुरुष आणि महिला गटात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृती चिन्ह दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी
९८५०१११७१०, ९८२२४८३७१४, ९६५७०७५१२३, ९०२१८०८८९७
या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन परशुराम वाडेकर, व डॉ.विजय खरे यांनी केले आहे.