E-PaperTop News

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या ५ व्या शाखेचे येरवड्यात उद्घाटन संपन्न

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या ५ व्या शाखेचे येरवड्यात उद्घाटन संपन्न

पुणे –  प्रतिनिधी , (माझा इंडिया न्यूज ) 12/01/25

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने पुणे शहरात ठीक ठिकाणी शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी येरवड्यातील अग्रेसन शाळेजवळील, आंबेडकर सोसायटी येथील मुख्य रस्ता लगत चौकात रुग्ण हक्क परिषदेच्या पाचव्या शाखेच्या नामपलकाचे अनावरण परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
पाचव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये, फारूख सोलापुरे, के. सी. पवार, कविताताई डाडर, रेश्माताई जांभळे, डॉ. योगेश कदम, प्रदीप बाबर, प्रा. आर. आर. सोनकांबळे, अरविंद नाखले, गौरव चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
तर येरवडा शाखेचे पदाधिकारी उपाध्यक्ष विमल सोंडे, संघटक रुपाली जावा, अनिता चिंचोलीकर, सदस्य शोभा वाघेला, सचिव रंजना जगताप यांच्यासह स्थानिक नागरिक आणि मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.
येरवडा शाखेची उभारणी करण्यासाठी पुणे शहर उपाध्यक्ष रेखाताई वाघमारे आणि प्रमुख संघटक प्रभाताई अवलेलू यांनी नेतृत्व केले.

*अधिक माहितीसाठी-*
8956185702

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button