
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ आरती डावरे यांची निवड – केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री श्री रामदास आठवले
दिनांक 25/1/25 प्रतिनिधी, माझा इंडिया न्यूज;
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ. आरती डावरे यांची निवड..
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थिती सौ आरती डावरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले..
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अण्णासाहेब वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री संतोष भाऊ काची, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब जोगदंड, दत्ता चव्हाण -संघटक सचिव पश्चिम महाराष्ट्र, श्री धीरज सकट पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष, श्री सुनील जाधव माजी शहराध्यक्ष- पुणे, विलास पाटोळे पुणे शहराध्यक्ष, नेहाताई पवार -पुणे शहर महिला अध्यक्ष इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सौ आरती ताई डावरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी सौ. आरतीताई डावरे यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.. यावेळी सौ आरती ताई डावरे यांनी पक्ष वाढीसाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत.. असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदासजी आठवले यांना दिले..!!