पिंपरी चिंचवड शहरातील कचराकुंडीतील दैनंदिन कचरा व्यवस्थापन आरोग्य अधिकारी यांच्याशी आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून लुटमार करणाऱ्या एस .जे .इनव्हायरो कंपनीवर आयुक्त कारवाई करतील का?:- लोकसेवक युवराज दाखले

पिंपरी चिंचवड शहरातील कचराकुंडीतील दैनंदिन कचरा व्यवस्थापन आरोग्य अधिकारी यांच्याशी आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून लुटमार करणाऱ्या एस .जे .इनव्हायरो कंपनीवर आयुक्त कारवाई करतील का?:- लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी:-प्रतिनिधी , (माझा इंडिया न्यूज) 31/01/25
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कचऱ्या मुळे रोगराई पसरू नये म्हणून दैनंदिन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी एस .जे .इनव्हायरोया कंपनीला करोडो रुपयाचा ठेका देण्यात आलेला आहे. परंतु ही कंपनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी यांच्याशी आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी मिळणाऱ्या पैशांची उधळपट्टी करीत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग प्रभाग अंतर्गत राहटणी काळेवाडी परिसरामध्ये वरील कंपनीचे कामगार कचरा व्यवस्थापन करत असताना मातीचे ढिक गाडीमध्ये भरून त्याचं चुकीच्या पद्धतीने वजन वाढवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरी वरती आरोग्य अधिकारी यांना हाताशी धोरण दरोडा टाकण्याचे काम ही कंपनी करीत आहे
महापालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंह साहेबांनी संबंधित कंपनी व अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ या राज्यातील संघटनेच्या वतीने केली आहे अन्यथा सर्वसामान्य जनतेला लोकहितासाठी सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्याचा इशारा दाखले यांनी दिला आहे