नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे महाराष्ट्र सेवक युवराज दाखले यांची मागणी
मुंबई, दि. १७ : माझा इंडिया न्यूज: राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात याव्यात. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र सेवक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र सेवक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना निवेदनाद्वारे म्हणाले आहे की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. मात्र या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. ज्या सेवा सध्या ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा. अशी मागणी दाखले यांनी केली आहे.
दाखले निवेदनाद्वारे म्हणाले की, नागरिकांना सुमारे ९९ टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही,
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ईज ऑफ डूईंग बिझनेस संकल्पनेवर काम करण्यावर भर देत आहोत. त्यानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार शासनाकडे केंद्रीत केले जाऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे दाखले यांनी केली आहे.