मुंबई गोदी मधुन येणाऱ्या ओव्हर लोडिंग वाहतूकीवर तात्काळ कारवाई करा – लोकसेवक युवराज दाखले

मुंबई गोदी मधुन येणाऱ्या ओव्हर लोडिंग वाहतूकीवर तात्काळ कारवाई करा – लोकसेवक युवराज दाखले
मुंबई – 27/01/25 प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज), मुंबई गोदी मधुन लोखंडी रिल ओव्हर लोडिंग वाहतूक करण्याच्या संदर्भात शिवशाही येणाऱ्या व्यापारी संघ संलग्न शिवशाही वाहतूक आघाडी आक्रमक कोकण प्रदेशाध्यक्ष संगम जाधव यांच्या नेतृत्वाखाली गाड्या पकडून देण्याचं त्याचबरोबर शासनाला महसूल गोळा करून देण्याची प्रक्रिया खलापुर टोलनाका या ठिकाणी करण्यात आली यामुळे राज्य सरकारला लाखो रुपयांचा महसूल दंडात्मक कारवाई करून मिळणार आहे तसेच होणारी नागरीकांची जिवीतहाणी थांबणार आहे.
त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करून शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानले.
यावेळी जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे,शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते