मुख्यमंत्री वैद्यकीय आर्थिक सहाय्यता मदत कक्षाचे प्रमुख मा.मंगेशजी चिवटेंचा आळंदी देवाची येथे सत्कार – पांडुरंग आवारे-पाटील
आळंदी(प्रतिनिधी) माझा इंडिया न्यूज दि.22 /01/25 महाराष्ट्रात आरोग्यदुत म्हणून परिचित आसलेले मुख्यमंत्री वैद्यकीय आर्थिक सहाय्यता मदत कक्षाचे प्रमुख व मा मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंञी ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय अगदी जवळचे सहकारी मा मंगेश दादा चिवटे हे दि.22 जानेवारी 2025 रोजी श्रीक्षेत्र अयोध्या येथील श्री रामचंद्रप्रभु मूर्ती प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्धापनदिनानिमित्त पर्वकाळाचे औचित्य साधून हिंदू महोत्सव – 2025 आळंदी देवाची येथे कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत म्हणून आले आसता शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड,शहर पुणे. श्री.पांडुरंग आवारे-पाटील यांच्या काॅटन इंडिया हाऊस देहू फाटा आळंदी येथे सदिच्छा भेट दिली आसता काॅटन इंडिया हाऊस च्या वतीने मंगेश चिवटेचें स्वागत करून सत्कार केला व मंगेश दादा चिवटे यांनी महाराष्ट्रातील 40.000 हजारांहून अधिक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत कक्षा च्या माध्यमातून मंञालयातून आर्थिक मदत मिळून दिल्याबद्दल व त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल मंगेश चिवटेचें कौतुक करून पुढील यशस्वीवाटचालीस पांडुरंग आवारे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व यावेळेस लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या अठवणींना उजाळा देखील चिवटेंनी दिला व अन्य सामाजिक राजकीय विविध विषयांवर संवाद साधत चर्चा केली याप्रसंगी हनुमंत आवारे-पाटील, मंगेश लटके व मंगेश चिवटे यांचे अन्य सहकारी उपस्थित होते.