
काॅटन इंडिया हाऊस 4 या दालनाचे मोशी येथे आ.पै.महेश दादा लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन शुभारंभ संपन्न
>—————————————<
तरूण युवकांनी समाजकारणा सोबत व्यवसाय पण करावा – पांडुरंग आवारे-पाटील
>——————————————->
मोशी दि 7/1/25 (प्रतिनिधी)( माझा इंडिया न्यूज ):- काॅटन इंडिया हाऊस शाखा.क्र. 4 या दालनाचे शुभारंभ पिंपरी-चिंचवड शहरात,भोसरी लगत आसलेले मोशी मेन चौक, हवेली सहकारी बॅंक समोर सावतामाळी हाॅटेलच्या बाजुला मोशी,पुणे.येथे भोसरी विधान सभेचे लोकप्रिय हिंदुत्ववादी आमदार पै.महेश दादा लांडगे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे मा महापौर श्री. नितीन आप्पा काळजे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन शुभारंभ संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख उपस्थिती शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे.श्री.पांडुरंग आवारे-पाटील, नगरसेवक पिं-चिं मनपा श्री.वसंत शेठ बोराटे,नगरसेवक श्री.विकास शेठ डोळस, नगरसेविका सौ.निर्मलाताई गायकवाड, राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड महिला शहर अध्यक्षा सौ.कविताई अल्हाट, युवा नेते श्री.कुलदीप परांडे, युवा नेते श्री.निलेश शेठ बोराटे,उद्योजक श्री.अनिकेत भाऊ तापकीर,भराटे कट्रकश मालक उद्योजक श्री.चंद्रकांत भराटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी आ.पै.महेश दादा लांडगे यांनी बोलत आसताना काॅटन इंडिया हाऊस चे मालक श्री.प्रतिक आहेर यांना हा व्यवसाय उत्तर उत्तरी प्रगती ह्वावी व मोशी मध्ये हा व्यवसाय होत आसताना आमचं ग्रामदैवत नागेश्वर महाराज अत्यंत जागरूक हे देवस्थान आहे नागेश्वर महाराज या भुमी मध्ये हा व्यवसाय चालु करत आसताना नागेश्वर महाराज चरनी प्रार्थना करतो की आमच्या प्रतिक आहेर च्या व्यवसाय मध्ये त्यांची उत्तर उत्तर प्रगती व्हावी व त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आशा शब्दात आ.महेश दादांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी शिवसंग्राम पिंपरी-चिंचवड शहराचे संपर्कप्रमुख पांडुरंग आवारे-पाटील यांनी देखील आपल्या भाषणातून तरूण युवकांनी समाजकारणा सोबत व्यवसाय करावा कारण समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. तरूणांच्या हाताला शिक्षण घेऊन देखील काम नाही. तरुणांची फौज समाजकारण आणि राजकारण करू पहात आहे.त्यांनी समाजकारणा सोबत व्यवसाय,उद्योगधंदा करावा व महाराष्ट्र सरकार च्या विविध योजनेचा आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचा लाभ तरूण युवकांनी घेऊन स्वाताच्या पायावर उभा राहून उद्योगधंदे केले पाहिजेत असे मत शिवसंग्रामचे नेते व काॅटन इंडिया हाऊस चे सर्वेसर्वा श्री पांडुरंग आवारे-पाटील यांनी आपले व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक बंन्टी गोडसे,सूर्यकांत भराटे, बाबुराव आप्पा आहेर,C A गणेश नाईकवाडे,काॅटन इंडिया स्टोर मोशी चे मालक लक्ष्मण शिंदे,काॅटन इंडिया हाऊस आळंदी चे मालक हनुमंत आवारे-पाटील, काॅटन इंडिया हाऊस नरेगाव चे मालक संकेत आनपठ, उद्योजक बळीराम कलबंड,बालाजी देवकर, राम डोके,बालाजी शेजाळ, मंगेश लटके व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.