
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी येथील समाधी स्थळाला प्रत्येक जिल्ह्यातील समाज बांधवांनी भेट द्यावी – शिवाजीराव खडसे -शिवशाही व्यापारी संघ अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर
पुणे:- 23/01/25 प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज)
शिर्डी येथील मातंग समाज बांधवांनी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी येथील समाधी स्थळाला भेट दिली या समाज बांधवांचा स्वागत सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर समन्वयक तथा शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी केले.
यावेळी आलेल्या समाज बांधवांना जिलेबी वाटप जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
याप्रसंगी सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, ऋषिकेश वाघमारे, अनिलजी तांबे, गणेश कलवले, मंगेश डाकोरे ,पत्रकार माणिक पौळ, आदी प्रमुख पदाधिकारी यांनी आलेल्या समाज बांधवांचे स्वागत केले.
दरम्यान लोकसेवक युवराज दाखले म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील मातंग समाज बांधवांनी क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यासाठी यावे अशी विनंती व आव्हान दाखले यांनी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज बांधवांना तसेच बहुजन समाजाला केली आहे