
ज्ञानगंगा मुक्ता साळवे सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न- शिवाजीराव खडसे
पिंपरी :- 09/01/25 : प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज)ज्ञानगंगा मुक्ता साळवे सार्वजनिक ग्रंथालय साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पूर्णाकृती स्मारक निगडी शेजारी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व महिला आघाडी अध्यक्षा तथा शिवशाही व्यापारी संघ मावळ लोकसभा अध्यक्ष भारतीताई चांदणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी शाहीर आसाराम कसबे यांनी पुस्तक रूपी मदत करून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच शालेय विद्यार्थी यांनी लोकसेवक युवराज दाखले यांचे आभार मांडले
या प्रसंगी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा अध्यक्ष तथा शिवशाही व्यापारी संघ वरिष्ठ उपाध्यक्ष अण्णासाहेब कसबे, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे दादासाहेब आढागळे, सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे,शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी मावळ लोकसभा अध्यक्ष भारतीताई चांदणे,
तसेच शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, महासचिव सुरज अण्णा कांबळे , उपाध्यक्ष अनिकेत साळवे ,पिंपरी चिंचवड शहर सचिव राहुल सावंत ,भोसरी विधानसभा अध्यक्ष मारुती काळे, बालाजी नगर विभाग उपाध्यक्ष करण समुद्रे,लहुजी शक्ती सेना युवक अध्यक्ष अक्षय पौळ, उपाध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, उपाध्यक्ष नितीन कांबळे ,शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल तांबे आधी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.