माननीय स्मॉल कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून ऑर्डर देऊन सुद्धा एस जे कॉन्ट्रॅक्ट प्रावेट लिमिटेड कंपनी व बालेवाडी पोलीस स्टेशन यांनी दाखवली कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली:- उद्योजक सुनिल बिरादार

माननीय स्मॉल कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून ऑर्डर देऊन सुद्धा एस जे कॉन्ट्रॅक्ट प्रावेट लिमिटेड कंपनी व बालेवाडी पोलीस स्टेशन यांनी दाखवली कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली:- उद्योजक सुनिल बिरादार
पुणे-04/01/25 प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज ) एस जे कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट कंपनी मध्ये वरचे काम शता सिद्धी इंडस्ट्रियल या माध्यमातून उद्योजक सुनील बिरादार यांनी काम केले होते. या कामात होती एवढी रक्कम एकुण ९लाख ७६हजार ९६रूपयांचे काम केले. त्यापैकी ८लाख ७५हजार रूपये टप्या टप्यात त्यांनी दिले.
परंतु उर्वरित रक्कम १लाख १०९६रूपये देण्याकरता टाळाटाळ करत असल्याने स्मॉल इंडस्ट्री कोर्टामध्ये दावा दाखल करण्यात आला होता मेहरबान कोर्टांनी उरलेले १लाख१०९६रूपये व कायद्याप्रमाणे व्याजपैसे देण्याची आदेश ऑर्डर देऊन सुद्धा वरील प्राइवेट लिमिटेड कंपनी कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे या संदर्भात रीतसर बालेवाडी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज देऊन सुद्धा तपास अधिकारी ऐ पी आय बाबासाहेब जरेकर यांनी संगनमताने कोर्टाच्या ऑर्डरकडे दुर्लक्ष केले. असल्याचं दिसून येत आहे.
या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उद्योग मंत्री उदय सावंत साहेब यांच्याकडे दाद मागणार असल्याचं उद्योजक सुनील बिरादार यांनी सांगितले आहे. दाद मागून सुद्धा न्याय न मिळाल्यास एस जी कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेट वरती आमरण उपोषणाचा इशारा उद्योजक बिराजदार यांनी दिला आहे.