वाल्मिक कराड रोज 1 कोटी घरी घेऊन जायचा, पैसे जमले नाही तर हातपाय तोडायचा” खरं की खोटं..
उत्तम जानकरांचा गंभीर आरोप

वाल्मिक कराड रोज 1 कोटी घरी घेऊन जायचा, पैसे जमले नाही तर हातपाय तोडायचा” खरं की खोटं..?
Walmik Karad | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवे वळणे समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास चालू असताना, शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप केले आहेत.
उत्तम जानकरांचा गंभीर आरोप
उत्तमराव जानकर यांनी पत्रकार परिषदेतून वाल्मिक कराडवर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड रोज 1 कोटी रुपये घरी घेऊन जायचा. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. जानकर यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचाही संबंध असल्याचा दावा केला आहे आणि त्यांचा ‘कर्ता करविता’ असल्याचं म्हटलं आहे.
राजकीय कनेक्शन समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे राजकीय कनेक्शन समोर आलं आहे. वाल्मिक कराड, जो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, सध्या फरार आहे. या प्रकरणाच्या तपासात CIDने वाल्मिक कराडच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावलं आहे.
उत्तम जानकर यांनी वाल्मिक कराडच्या आर्थिक बाबतीतही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, वाल्मिक कराडची आर्थिक स्थिती इतकी मजबूत कशी झाली आहे, हे समजण्यासाठी तपास आवश्यक आहे. रोज 1 कोटी रुपये घरी घेऊन जाण्याच्या आरोपांनी वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठी बातम्या
गुन्हेगारी न्यूज
मराठी बातम्या