E-Paper

सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार

सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार

माझा इंडिया न्यूज:

पुणे : हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची फुरसुंगी फाटा येथून दोन दिवसांपूर्वी सकाळी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून चार जणांनी अपहरण केल्याची घटना घडली होती.

Updated:December 12, 2024 07:50 IST

पुणे हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची फुरसुंगी फाटा येथून दोन दिवसांपूर्वी सकाळी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून चार जणांनी अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. आमदारांच्या मामाची हत्या होऊन ३६ तास उलटून देखील आरोपींचा शोध लागत नव्हता. यामुळे सत्ताधारी पक्षावर टीका होऊ लागली होती. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी वाघोली येथून पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे या दोघांना ताब्यात घेतले. त्या आरोपींच्या चौकशीदरम्यान अन्य दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button