
राहुल ढवाण यांना आदर्श प्रेरणा पुरस्काराने नागपूर येथे सन्मानित
नागपूर – (माझा इंडिया न्यूज) 17/12/2024 ऑल जर्नालिस्ट ॲण्ड फ्रेण्ड्स सर्कल या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने १९ वर्षापासून संम्मेलन घेतले जात आहे. त्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक लोकांची निवड आदर्श प्रेरणा पुरस्कारास करिता करण्यात येते. २०२४ चे संमेलन नागपूर येथे संपन्न झाले , यावेळी महाराष्ट्रातून आराध्यांच्या सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून राज्यभरातील 36 जिल्ह्यांमध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांना उभारणी देण्याचे काम करणाऱ्या एनजीओ सक्षमीकरण अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक राहुल ढवाण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देशभरातुन अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त उपस्थित होते.