निगडीच्या खंडोबा मंदिरात चंपाष्टमीनमित्त हजारो भाविकांना महाप्रसाद
पिंपरी चिंचवड: निगडीच्या खंडोबा मंदिरात भाविकांनी चंपाषष्ठी निमित्त खंडेरायाच्या दर्शनाला केली गर्दी – श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री.तानाजी (अण्णा) काळभोर
चंपाषष्टी निमित्त हजारो भाविकांना महाप्रसाद
चंपाषष्टी म्हणजे मार्गशीर्ष शुध्द षष्टी अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते.
मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून श्री खंडोबा यांनी जनतेला त्यांच्या त्रासातून मुक्त केले होते.
तेव्हा पासून चंपाषष्टी मोठ्या उत्सवात संपन्न होत आहे.
निगडी येथील श्री खंडोबा मंदिरास चंपाषष्टी निमित्त फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात घट बसविण्यात आले होते.
*दि.7/12/2024 वार शनिवार रोजी चंपाषष्टी निमित्त देवस्थान चे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता श्री शंकराच्या पिंढीस व श्री खंडोबा च्या मुर्तीस महाअभिषेक करण्यात आला.दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत मंदिराच्या सभामंडपात सिद्धीविनायक महिला भजनी मंडळाने भजन सेवा केली.तसेच संध्याकाळी 5 ते 7 वाजे पर्यंत ओम श्री नाथ मल्हार यांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. यानंतर 7:15 वाजता महाआरती करण्यात आली. महाआरती झाल्यानंतर उपस्थित असलेल्या 6 ते 7 हजार भाविक भक्तांना देवस्थान च्या माध्यमातून बाजरीची भाकर,वांग्याचे भरीत,बुंदी,मसाले भात,कांद्याची पात अशा प्रकारचा महाप्रसाद देण्यात आला.
महाप्रसादासाठी निगडी ग्रामस्थ परिसरातील भाविक भक्त, व्यापारी यांनी कोरडा शिधा ( तांदूळ,तेल,बाजरी, साखर,वांगी,मिठ ) तसेच रोख स्वरूपात देणगी दिली होती.
या कार्यक्रमास आमदार सौ.उमाताई खापरे, नगरसेवक अमित गावडे,पंकज भालेकर,शांताराम बापू भालेकर,बापूसाहेब घोलप,सुरेशभाऊ चिंचवडे नगरसेविका शर्मिलाताई राजेंद्र बाबर,छबूताई सुरेश कदम,बांधकाम व्यावसायिक जयदिप खापरे,सुमित धुमाळ व माजी प.समिती सदस्य शांताराम बापू काजळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.या वेळी संपुर्ण महाप्रसाद बनविण्याचे काम संदीप केंदळे यांनी केले.
या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले होते.
*यावेळी देवस्थानट्रस्ट चे अध्यक्ष-श्री तानाजी (आण्णा) काळभोर ,उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर, खजिनदार जंगलीमहाराज काळभोर,कार्याध्यक्ष शंकर आप्पा काळभोर, सचिव भाऊसाहेब काळभोर तसेच विश्वस्त दिपक काळभोर,दिलिप काळभोर,राजेंद्र लक्ष्मण काळभोर, adv. राजेंद्र काळभोर,चेतन काळभोर,राजेंद्र अमृता काळभोर या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले