
PIMPRI CHINCHWAD :16/12/2024 :(MAJHA INDIA NEWS )
लढवय्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करावी
माजी खासदार. श्री अमर साबळे
परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असणाऱ्या संविधान शिल्पाची विटंबना झाली. त्यानंतर परभणी बंदची हाक देण्यात आली होती .या बंदमध्ये झालेल्या तोडफोडी नंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली होती. त्यापैकी एक आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणी येथे पोलीस कोठडी मध्ये संशयास्पद मृत्यू झालेला आहे .
लढवय्या सोमनाथ सूर्यवंशी यांना त्यानिमीत्त 16 डिसेंबर सकाळी ११ः३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . त्यावेळी पत्रकारांशी संवाद करून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करण्यात आली. निषेध मोर्चाचे आयोजन माझी खासदार व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री अमरजी साबळे, माऊली थोरात संजय मंगोडेकर गायकवाड ,रोहन सुनील भिसे आदीकार्यकर्ते उपस्थित होते