
Pimpri Chinchwad 19/12/2024 (माझा इंडिया न्यूज) चिखली-कुदळवाडी भागातील अनधिकृत भंगार दुकानांमध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे बेकायदेशील आश्रयस्थळे उध्वस्त करण्याच्या मोहीमेला अखेर सुरूवात
चिखली कुदळवाडी या भागातील रस्त्यांवर अतिक्रमण केलेली बांधकामे आणि पत्राशेड यासह महानगरपालिका आरक्षणांमध्ये बेकायदेशीरपणे उभारलेली दुकाने भुईसपाट करण्याची कारवाई पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईचे स्वागत.
पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागपूर येथील महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये केली होती. राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दोन दिवसांपूर्वीच दिले होते. बुधवारी ‘ॲक्शन’ झाली.
चिखली-कुदळवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सर्वातोपरी सहकार्य करावे. तसेच, पोलीस प्रशासनाने कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी आणि आगामी काळात बांगालादेशी, रोहिंग्यांची आश्रयस्थळे जमीनदोस्त करण्याची मोहीम तीव्र करावी, अशी प्रत्येक पिंपरी-चिंचवडकरांची भावना आहे.
राष्ट्रहितासाठी… कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘‘नो कॉम्प्रमाईज’’..!
#Kudalwadi #Chikhali #jayshreeram #pcmc #PimpriChinchwad