
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या भोसरी विधानसभेतील नामपलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं.:- शिवाजीराव खडसे .
पिंपरी:- प्रतिनिधी(माझा इंडिया न्यूज) 25/12/24 : शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ उपाध्यक्ष माणिकराव पोळ व प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांच्या सूचनेनुसार तसेच पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली भोसरी विधानसभा अध्यक्षपदी मारुती काळे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर करून भोसरी विधानसभेतील बालाजी नगर प्रभागातील शिवशाही व्यापारी संघाच्या नामफलकाचे उद्घाटन संस्थापक /अध्यक्ष युवराज दाखले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दरम्यान बालाजी नगरमधील संविधान चौकात नामफलकाला पुष्पहार संजय एडके यांच्या शुभहस्ते अर्पण करून भोसरी विधानसभा मतदारसंघातील बालाजी नगर विभागाचे पदाधिकारी नियुक्ती पुढील प्रमाणे करण्यात आली.
१) समाधान सोनवणे ( विभाग अध्यक्ष बालाजी नगर विभाग)
२) रोहन रोकडे (कार्याध्यक्ष बालाजी नगर विभाग)
३)विनोद बहनाबहने (सहकार्याध्यक्ष बालाजी नगर विभाग )
४)दशरथ पवार (महासचिव बालाजी नगर विभाग)
५) पप्पू काळे (सह महासचिव बालाजी नगर विभाग )
६)महादेव दिंडे (उपाध्यक्ष बालाजी नगर विभाग)
७) विजय वाघमारे (उपाध्यक्ष बालाजी नगर विभाग)
८) करण समुद्रे (उपाध्यक्ष बालाजी नगर विभाग )
९)अविनाश लोणखे (सचिव बालाजी नगर विभाग )
१०)बाप्पू वाघमारे ( उपसचिव बालाजी नगर विभाग)
११)अतुल कांबळे (संघटक बालाजी नगर विभाग )
१२)महादेव उदागे (संघटक बालाजी नगर विभाग )
तसेच सदस्य पदी गौतम बुटाले, प्रताप सोनवणे ,अंबादास वाकचौरे ,विशाल मुंजमुळे, संतोष वाघमारे, समाधान ठाकरे, बाबासाहेब दिंडे, किशोर बनसोडे, आस्तिक बनसोडे संजय कुरमुरे उद्योजक, शंभू साळवे ,उदय सोनपाकरे ,व पवन शिरसाठ यांचे बालाजी नगर विभाग शाखा अध्यक्षपदी शाखा सदस्य पदी नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्त पत्र वरिष्ठ उपाध्यक्ष माणिकराव पवार व मंगेश डाखोरे यांच्या शुभहस्ते देण्यात आले .
यावेळी शिवशाही व्यापारी संघ वरिष्ठ उपाध्यक्ष माणिकराव पौळ,प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे , युवा नेते संजय एडके, शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी मुळशी तालुका अध्यक्षा संगीताताई जाधव ,मावळ लोकसभा अध्यक्षा भारतीताई चांदणे, प्रदेश कार्यालयीन मुख्य सचिव कल्पना मोरे (दाखले) मार्गदर्शक ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे ,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले ,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, कार्याध्यक्ष अमोल लोंढे, उपाध्यक्ष अनिकेत साळवे ,राज वाघमारे ,आधी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.