
दुबईतील मराठी उद्योजकांना केंद्र सरकारचा पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई/दुबई दि.24 -( माझा इंडिया न्यूज) दुबई आणि सर्व संयुक्त अरब अमीरातीमध्ये उद्योग क्षेत्रात मराठी माणुस अग्रेसर आहे. सर्व आखाती राष्ट्रा मध्ये अग्रेसर असणाऱया मराठी उद्योजकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा पुर्ण पाठिंबा आहे.दुबईत मराठी माणुस उद्योगात मराष्ट्राचा नावलौकिक वाढवत असल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
दुबईतील गल्फ महाराष्ट्र बिजनेस फोरम च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ना.रामदास आठवले बोलत होते.जी एम बी एफ ग्लोबल च्या वतीने ना.रामदास आठवले यांचा दुबईतील मराठी उद्योजकांशी संवाद आणि सत्कार आयोजित करण्यात आला होता.जी.एम बी एफ च्या या संमेलनात ना.रामदास आठवले यांनी दुबईत उद्योग करणाऱ्या मराठी माणसाचे आम्हाला अभिमान असल्याचे गौरव उद्गार काढले.
आखाती देशात मराठी माणसांची संख्या मोठी आहे.महाराष्ट्रातुन येऊन दुबईत आपले स्थान मजबुत करणाऱ्या मराठी उद्योजकांकडुन उद्योगाची प्रेरणा मिळते असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
गल्फ महाराष्ट्र बिजनेस फोरम चे सचिव विवेक कोल्हटकर यावेळी उपस्थित होते.दोन वर्षापर्वी गल्फ महाराष्ट्र बिजनेस फोरम च्या कार्यक्रमास दुबईत ना.रामदास आठवले उपस्थित राहिले होते यांची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.
#RamdasATHAWALE #Dubai #MumbaiMumbai #RPI (A)