
Marathi News /Mumbai News/Nashik news (माझा इंडिया न्यूज) 19/12/2024
समुद्राची सैर करायला गेलेल्या नाशिकच्या अहिरे दांपत्यांचा बोट दुर्घटनेत मृत्यू
उपचारासाठी मुंबईला गेलेलं नाशिकचे अहिरे कुटुंब, उपचार संपवून कुटुंबाला फिरायला जायचा प्लॅन कुटुंब संपवून गेला…
नाशिकमध्ये गुण्यागोविंदाने संसार करणारे अहिरे कुटुंब काल मुंबईत झालेल्या बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहे. नाशिकचे राकेश अहिरे आपल्या दम्याच्या उपचारासाठी मुंबईला जायचे. दवाखाना आटोपून ते पत्नी आणि मुलासह मुंबईत फिरायला गेले. एलिफंटाला जाताना बोटचा दुर्दैवी अपघात झाला आणि यात राकेश यांचा जागेवरच तर पत्नी हर्षदा आणि मुलगा निधेश यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. राकेश यांचे वडील नाना अहिरे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐