E-PaperTop News

पिंपरी : मुलाला दवाखान्यात घेऊन जाताना दरवाजा बंद करण्याचे विसरले; शेजारणीने सव्‍वासहा लाखांचे दागिने लांबविले

ईपेपर
महाराष्ट्र
शहर
ब्रेकिंग न्यूज

चालू घडामोडी

पुणे (माझा इंडिया न्यूज)
December 18, 2024 ,11:40 am
पिंपरी : मुलाला दवाखान्यात घेऊन जाताना दरवाजा बंद करण्याचे विसरले; शेजारणीने सव्‍वासहा लाखांचे दागिने लांबविले (छायाचित्र – माझा इंडिया न्यूज)

पिंपरी : उघड्या दरवाजावाटे घरात घुसून दागिने चोरी करणार्‍या शेजारील महिलेला काळेवाडी पोलिसांनी अटक केली. तिच्‍याकडून सव्‍वासहा लाखांचे दागिने हस्‍तगत केले. सोनाली निलेश ओहोळ (वय ३४, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्‍या महिलेचे नाव आहे. आकाश संतोष आचारी (वय ३०) यांनी याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी आचारी यांच्‍या मुलाची प्रकृती खालावल्‍याने ते त्‍यास घेऊन डॉक्‍टरकडे गेले. गडबडीत दरवाजा बंद करण्‍यास विसरले असताना गैरफायदा घेत सोनालीने उघड्या दरवाजावाटे घरात घुसून सहा लाख २९ हजार रुपयांच्‍या दागिन्‍यांची चोरी केली. तिला ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. तिच्या घरातून २.७५ तोळे वजनाचे मंगळसुत्र, ३.७५ तोळ्याचे मनीमध्ये पेंडल असलेले मंगळसुत्र, एक तोळे वजनाचे सोन्याचे चॉकर, अर्धा तोळ्याचे सोन्याचे कडे, १.५ ग्रॅमचे सोन्याचे बदाम, ५.५ ग्रॅमचे २ सोन्याच्‍या चैन,चांदीचे लहान मुलाचे १७ जोड बांगडया, करदोडा, जोडवे, असा एकूण सहा लाख २९ हजार रुपये किंमतीचे ८.७ तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागीने जप्त केले आहे

ही कामगिरी पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनिल कुराडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहीरट, निरीक्षक विक्रम बनसोडे, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, नागनाथ सुर्यवंशी, अंमलदार प्रमोद कदम, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, रमेश खेडकर, अजय फल्ले, प्राजक्ता चौगुले यांच्‍या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button