बहुजन समाजातील युवक व युवतींना स्वतःच्या पायावरती उद्योग व व्यापार देऊन स्वालंबी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार- शिवाजीराव खडसे


बहुजन समाजातील युवक व युवतींना स्वतःच्या उद्योग व व्यापार देऊन स्वालंबी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार- शिवाजीराव खडसे
पिंपरी- प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज) 11/12/2024 शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी शिवाजीराव खडसे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केल्यानंतर छत्रपत्ती शिवाजी महाराज,फुले ,शाहू, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ व लहुजी यांच्या विचारांशी प्रामाणिकपणे काम करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी या ठिकाणी सन्मान करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बी.बी शिंदे, संतोष जोगदंड, राहुल सोनवणे, शिवशंकर उबाळे, अशोक कदम, भास्कर टिकटे आर .जी. ओव्हाळ, अनिरुद्ध सूर्यवंशी, साहेबराव शिराळे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.