वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ

वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चंदननगर, पुणे येथे आयोजित भव्य सभा नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादासह यशस्वीपणे पार पडली. ही सभा वडगाव शेरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासाला प्रतिसाद देणारी ठरली. सभेच्या उत्साही वातावरणात अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. सुनिल आण्णा टिंगरे यांच्या दूरदर्शी विचारसरणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे वडगाव शेरीच्या जनतेने या सभेला प्रचंड पाठिंबा दर्शवला. महायुतीच्या एकत्रित नेतृत्वाखाली वडगाव शेरीचा विकास हा नक्कीच सुसंगत आणि प्रगतीशील असेल. या सभेत सिद्धार्थ पाटील, माजी आमदार जगदीशभाऊ मुळीक, वसंतरावजी पठारे, मा. नगरसेविका मीनल सरोदे, उषाताई कळमकर, सुनिताताई गलांडे, निशिगंधा सोनवणे, पांडुरंग खेसे, राहुल भंडारे, संदिप जराड, महेश गलांडे, अर्जुन गरुड यांसह महायुतीतील अनेक प्रतिष्ठित नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
NCPSpeaks_Official Ajit Pawar Sunil Tingre Jagdish Mulik
#विजयी_भव_महाराष्ट्रवादी
#MaharashtraElection2024
#maharashtra #NCP