विमानातील तब्बल १४० प्रवाशांचे प्राण वाचवले. मैत्रेयी शितोळे पुणेकर मुलीचे जगभर कौतुक
विमानातील तब्बल १४० प्रवाशांचे प्राण वाचवले. मैत्रेयी शितोळे पुणेकर मुलीचे जगभर कौतुक
जमिनीपासून ३६ हजार फूट उंचीवर असणाऱ्या विमानामध्ये बिघाड झाला आणि सर्व प्रवाशांच्या हृदयाची धडधड अधिकच वाढली. आता आपण काही वाचणार नाही, अशीच अवस्था सर्वांची झाली असणार ! पण त्यामध्ये पुण्याच्या सहवैमानिक असणाऱ्या मैत्रेयी शितोळे हिने अतिशय धीराने सर्व परिस्थिती हाताळली आणि विमानातील बिघाड दुरुस्त केला. त्यामुळे विमानातील तब्बल १४० प्रवाशांचे प्राण वाचवले. मैत्रेयी शितोळे पुणेकर मुलीचे जगभर कौतुक होत आहे.
मैत्रेयी ही एअर इंडियामध्ये सहवैमानिक म्हणून गेल्या चार-पाच वर्षांपासून काम करते. मैत्रेयीने न्यूझीलंडमधील मेनलँड एव्हिएशन कॉलेज, ड्युनेडिन येथे वैमानिकचे प्रशिक्षण घेतले. तिथेच तिने व्यावसायिक पायलट म्हणून काम सुरू केले. त्यानंतर मात्र मैत्रेयीने भारतात येऊन नोव्हेंबर २०१९ पासून ग्राऊंड इन्स्ट्रक्टर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
#news #maitreyeeshitole #pune #airindia #successstories