रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडी समाजाची स्पष्ट भूमिका*
*श्री अश्विन प्रदीप खुडे* (शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडी)
पिंपरी चिंचवड (माझा इंडिया न्यूज) 15/10/24
*श्री अश्विन प्रदीप खुडे
(शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडी)
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडी समाजाची स्पष्ट भूमिका
*पिंपळे गुरव : चिंचवड विधानसभा, पिंपरी विधानसभा व भोसरी विधानसभा या तीनही मतदार संघामध्ये आरपीआय (A) मातंग आघाडीला न्याय मिळत नाही. येणाऱ्या विधानसभेला आरपीआय (A) युतीच्या वतीने आघाडीच्या वतीने जे उमेदवार आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) व इतर मित्र पक्ष हे आम्हाला डावलत असतात. गेल्या लोकसभेला देखील आमचा विचार केला गेला नाही. पिंपरी चिंचवड शहरात मातंग समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत आहे. तीनही मतदार संघामध्ये मातंग समाजाची लोकसंख्या व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडीला जोडण्यात आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. तरीसुद्धा मातंग समाजाची दखल घेत नाहीत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या पद्धतीनुसार वेगळा विचार करू याची खबरदारी महायुतीकडून सर्व उमेदवारांकडून घेण्यात यावी. ही विनंती.*