Uncategorized

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू (छायाचित्र- माझा इंडिया न्यूज)

PUNE:VANRAJ ANDEKAR MURDER

1.पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू (छायाचित्र- माझा इंडिया न्यूज)

PUNE: VANRAJ ANDEKAR MURDER

  • Date 01/09/2024
  • पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने शहराच्या मध्य भागात घबराट उडाली.
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तसेच, कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.

गोळीबाराच्या घटने अगोदर डोके तालीम परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता , या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीचा खूप मोठा धबधबा आहे त्यामुळे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात सर्वत्र घबराट उडाली आहे वनराज यांच्यावर निकटवर्ती यांनी गोळीबार केला असून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांकडून समजत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button