पिंपरी : मुळा नदीवरील बोपखेल पुलाचे काम चार वर्षांनी पूर्ण, आता लोकार्पणासाठी…!

पिंपरी : मुळा नदीवरील बोपखेल पुलाचे काम चार वर्षांनी पूर्ण, आता लोकार्पणासाठी…!
बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून, आता लोकार्पणाची प्रतीक्षा आहे.
September 27, 2024 09:12
पिंपरी : मुळा नदीवरील बोपखेल पुलाचे काम चार वर्षांनी पूर्ण, आता लोकार्पणासाठी…! (छायाचित्र – माझा इंडिया न्यूज)
पिंपरी : बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून, आता लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यावर १६ किलोमीटरचा वळसा मारून पिंपरीत यावे लागत असलेल्या बोपखेलवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बोपखेल गावासाठी दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) हद्दीतून जाणारा नागरी रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला. त्यामुळे बोपखेल गावातील रहिवाशांना पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करण्यासाठी पूर्वी लागणारे दोन किलोमीटरचे अंतर १६ किलोमीटर झाले. भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरून १६ किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांसह, विद्यार्थी, कामगारांची मोठी गैरसोय होत असल्याने पिंपरी महापालिकेने २० जुलै २०१९ रोजी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर १८५६ मीटर म्हणजेच दोन किलोमीटर अंतराचा पूल बांधण्याचे काम हाती घेतले.