पिंपरी चिंचवड: 07/09/24 ( माझा इंडिया न्यूज) देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत विविध मांडल्या समस्या –
पिंपरी चिंचवड: 07/09/24 ( माझा इंडिया न्यूज) देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत विविध मांडल्या समस्या -

पिंपरी चिंचवड: 07/09/24 ( माझा इंडिया न्यूज) देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत विविध मांडल्या समस्या – श्री तानाजी काळभोर
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ब्रिगेडियर अमन कटोज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयावरती चर्चा करण्यात आली यावेळी बोर्ड सीईओ पुष्पांजली रावत, सदस्य कैलास पानसरे ,बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अँड.प्रवीण झेंडे ,विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार यांच्यासह लष्करी अधिकारी बोर्डाचे अधिकारी आणि लोकप्रति निधी उपस्थित होते
बोर्डाचे सीईओ रावत यांनी बोर्डाच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली बोर्डाकडे सध्या अवघे 15 लाख रुपये शिल्लक असून केंद्राकडून व राज्याकडून कोणताही निधी उपलब्ध होत नसल्याची त्यांनी सांगितले महानगरपालिके प्रमाणे जीएसटीची नुकसान भरपाई मिळत नसल्याचे अध्यक्ष कटोच व सदस्य पानसरे यांनी निदर्शनास आणून दिले ब्रिगेडियर अमन कटोरी यांनी पालखी मार्ग चौपदरीकरण अगर सहा पदरीकरण करून सर्वांना भेडसावनी भेडसावणारी समस्या दूर करण्याची मागणी केली यावेळी धर्मपाल तंतरपाळे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी काळभोर ,बाळासाहेब भेगडे, आणि अनिस शेख आदींनी या सूचना केल्या तसेच पवना नदीत प्रक्रिया न करता जाणारे सांडपाणी रोखण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आल्या विविध मुद्द्यावर कार्यवाही लवकर होणार असल्याचे सांगण्यात आले महानगरपालिका हद्दीलगत कॅन्टोन्मेंट भागात रस्ते ड्रेनेज आधी कामे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न बाबत येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच मावळ चे आमदार श्री सुनील आण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित होते.