Uncategorizedअपरिचित इतिहासआर्थिक घडामोडीउद्योग विश्वनोकरी विशेष

EPS -95 राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी- चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील पेन्शनर्स चा महामेळावा

PIMPRI CHINCHWAD EPS -95 पेन्शनर्स महामेळावा रविवार दि.22/9/2024 रोजी EPS -95 राष्ट्रीय संघर्ष पेन्शनर्स चा महामेळावा राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार पै.महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थित भोसरी येथील संत तुकाराम बॅक्वेट हाॅल मध्ये संपन्न झाला* या वेळी कंमाडर अशोकराव राऊत साहेब व महासचिव विरेंद्रसिंग राजावत म्हणाले कि केंद्र सरकार ने पेन्शनधारकांचा अंत पाहू नये.आम्हाला किमान 7500 रू.पेन्शन, महागाई भत्ता तसेच मोफत वैद्यकीय सुविधा तत्काळ देण्यात याव्यात यासाठी राज्य सरकारने देखील तातडीने मध्यस्थाची भूमिका घेणे आवश्यक आहे अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत सरकार ला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 1/10/2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये EPS -95 समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, व तत्पूर्वी दिनांक 27.09.24रोजी देशांतील सर्व EPFO कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
*या वेळी भोसरी विधान सभेचे आमदार महेशदादा लांडगे म्हणाले कि हा विषय मी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करुन त्यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी साहेब यांच्या पर्यंत पोचविण्याचा नक्की प्रयत्न करेन व हा विषय जर मार्गी लागला तर महाराष्ट्र तील 13 लाख पेन्शनर्स नागरिकांचा मला आशिर्वाद मिळेल असे आमदार साहेब म्हणाले*
या वेळी नगरसेवक नाना लोंढे व कार्तिकशेठ लांडगे तसेच EPS-95 चे राष्ट्रीय मुख्य सल्लागार डाॅ.पी.एन.पाटील,पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, मुख्य समन्वयक विलासराव पाटील,मुख्य समन्वयक प.भारत सी.एम. देशपांडे, राष्ट्रीय महिला संघटक सरिताताई नारखेडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी.एस. नारखेडे,अध्यक्ष महाराष्ट्र एस.एन. आंबेकर,अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र देविसिंग आण्णा जाधव, सचिव महाराष्ट्र सुधिर चांडगे, उपाध्यक्षा महाराष्ट्र महिला श्रीमती आशाताई शिंदे, छत्तीसगड चे समन्वयक एजाज उर रहेमान, श्रीगोंदा अध्यक्ष भगवान आप्पा वाळके, अहमदनगर जि.अध्यक्ष संपतराव समिंदर, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रतापराव देसाई,सचिव संगमनेर सुरेश कटारिया तसेच सल्लागार पश्चिम महाराष्ट् सतिश शिंदे, पुणे समन्वयक अजितकुमार घाडगे, सचिव बाळासाहेब गावडे, जि.महिला अध्यक्षा पुनमताई गुजर, पिंपरी- चिंचवड शहर अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, कार्याध्यक्ष विजय आण्णा जगताप, कोषाध्यक्ष सुरेश साळुंके,प्रसिध्दी प्रमुख सुधीर ढगे,महिला अध्यक्षा अलकाताई मोरे, सचिव सविताताई शर्मा,सदस्य सौ.मंगल तानाजी काळभोर तसेच पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हातील सर्व विभागचे पदाधिकारी उपस्थित होते.
*भोसरी येथे हा मेळावा घेण्यासाठी हाॅल व सर्व पेन्शनर्स साठी भोजनाची व्यवस्था ही आमदार पै.महेशदादा किसनराव लांडगे व कार्तिकशेठ किसनराव लांडगे यांनी केली होती*
या महामेळाव्यास आदाजे 3000 हजार पेन्शनर्स नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन तानाजी आण्णा काळभोर यांनी केले. व आभार पिंपरी चिंचवड समन्वयक मच्छिंद्र दरवडे यांनी मानले*
कळावे
*EPS -95 राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हा, महाराष्ट्र*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button