खेळ

चिंचवड मधील स्वप्नील चिंचवडे यांनी पटकावला ‘आर्यनमॅन’ किताब

चिंचवड मधील स्वप्नील चिंचवडे यांनी पटकावला ‘आर्यनमॅन’ किताब

चिंचवड मधील स्वप्नील चिंचवडे यांनी पटकावला 'आर्यनमॅन' किताब
पिंपरी (Pclive7.com):- इटली येथे झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत स्वप्नील चिंचवडे यांनी पिंपरी चिंचवड शहराचा झेंडा पुन्हा अटकेपार फडकावला. त्यांनी ही स्पर्धा १३ तास २८ मिनिटे व दोन सेकंदात पूर्ण केली.

मागील वर्षी स्पेन (बार्सिलोना) मध्ये झालेल्या स्पर्धेतही त्यांनी यश मिळवले होते. आज पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चिंचवड गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचा भव्य सत्कार केला. इटली येथे २१ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत जगभरातून २३०० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यामध्ये भारतातील २० तर महाराष्ट्रातील पाच जण होते. या स्पर्धेत ४२ किलोमीटर धावणे, ३.८ किलोमीटर पोहणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग असे तीनही प्रकार करावे लागतात. या तीनही प्रकारात ४२ वर्षीय स्वप्निल चिंचवडे यांनी बाजी मारली.

गुरुवारी रात्री (ता.२६) त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरात ते आले. त्यांच्या यशाने पिंपरी चिंचवड मधील खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण झाले असून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आपले वडील पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चिंचवडे यांना देत त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया आज व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button